गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत विद्यामाता इंग्लिश शाळेला ६७ सुवर्णपदके

लोहारा (जि. धाराशिव): नुकत्याच घेण्यात आलेल्या गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत ६७ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विद्यामाता इंग्लिश शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.
गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेसाठी विद्यामाता शाळेतील एकूण ८७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधील ६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी रणजीत कांबळे यांनी करून घेतली. मुख्यापिका हिरा सोलापुरे, पर्यवेक्षक सुनील कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाबद्दल असणारी आवड लक्षात येते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टिकोन निर्माण होतो, असे मत मुख्याध्यापिका सालापुरे यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके, अॅड. दीपक जवळगे यांनी यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शिक्षिका सुवर्णा शिंदे, आशा कांबळे, हरूण हेड्डे, शिवमाला हुडगे ,अश्विनी आळंगे, ज्योती साठे, प्रतीक्षा गिराम, अस्मिता मम्माने यांनी पुढाकार घेतला.




