अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षेची सक्तमजुरीची शिक्षा

धाराशिव: आंबी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात परंडा सत्र न्यायालयाने २८ वर्षीय तरूणास तीन वर्षाचा कारावास व पाच हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी सागर सुभाष लेकुरवाळे, (वय २८ रा. लंगोटवाडी, ता. परंडा) १२ नोव्हेंबर २०२० रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलगी पाणी आणण्यासाठी जात असताना आरोपी सागर सुभाष लेकुरवाळे याने मुलगी अल्पवयीन हे माहित असताना तिचा विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात येथे कलम ३५४, ५०६ बाल लैगिंक आपराध कलम ८, १२ व अजाजअप्रका कलम ३(२)(व्हिए), ३(१)(आर)(एस), ३(१)(डब्ल्यू) प्रमाणे १३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी करुन मा. न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्ह्यात मा. अतिरीक्त सत्र न्यायाधिश काळे अति. सत्र न्यायालय परंडा यांनी सदर आरोपीस देाषी धरुन तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आज सोनवारी १६. १०. २०२३ रोजी सुनावली आहे. सदर केसमध्ये शासकिय अभियोक्ता म्हणून श्री. कोळपे यांनी कामकाज पाहिले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि भूम येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, आंबी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी वेळोवेळी सदर केसचा पाठपुरावा करुन कोर्ट पेरवी अधिकारी ग्रेड पोउपनि/ढगे नेमणूक परंडा पो. स्टे व पोलीस हावलदार/१३७४ खुणे आंबी पोस्टे यांना सूचना देवून आढावा घेत होते. त्यामुळे सदर आरोपीस मा. न्यायालयाने पुराव्याचे आधारे शिक्षा सुनावली आहे.

