तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करून कर्मचाऱ्यांनी दिला निरोप

लोहारा (जि. धाराशिव): तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची निलंगा येथे बदली झाली आहे. बदली झाल्याबद्दल तहसील कर्मचारी व नागरिकांच्या वतीने सत्कार करून कुलकर्णी यांना निरोप देण्यात आला. पंचायत समिती सभागृहात सोमवारी सायंकाळी तहसीलदार कुलकर्णी यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नूतन तहसीलदार काशिनाथ पाटील होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार सुजाता हंकारे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी तारळकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जगदेव वग्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या सात महिन्याच्या अल्पकाळात लोकाभिमूख कामे केली. कामासाठी आलेल्या नागरिकांची व कार्यालयाती कर्मचाऱ्यांशी आपुलकीने चौकशी करून कामाचा निपटारा करत होते. त्यांची नुकतीच निलंगा येथे बदली झाली. त्यानिमित्ताने कर्मचारी व नागरिकांनी तहसीलदार कुलकर्णी यांचा भरपेहराव व पुस्तक भेट देऊन यथोचित सत्कार केला. प्रारंभी भागवत गायकवाड यांनी गीतांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मनोगतात आपल्याा भावना व्यक्त केल्या. यावेळी अनेक कर्मचारी भावूक झाले होते. यावेळी नायब तहसीलदार महादेव जाधव, पेशकार अशोक शिंदे, महसूल सहायक भागवत गायकवाड, निवडणूक विभागाचे वजीर अत्तार, मंडळ अधिकार वाजीद मनियार, बी. एस. बरनाळे, तलाठी दीपक रेड्डी, अभिजित गायकवाड, नरसिंग ढवळे, वैजनाथ जट्टे, पल्लवी माटे, महेश्वरी साळुंके, प्रियंका वाकळे, काजल किर्तने, पिंटू गडदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.





