विशेष जनसुक्षा कायदा संविधानाने देलेल्या अधिकाराची गळचेपी करणारा

लोहारा (जि. धाराशिव): राज्य सरकार विशेष जनसुरक्षा कायदा आणत असून या कायद्याद्वारे नागरिकांची मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सर्वस्तारातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून या जुलमी कायद्याला विरोध करणे आवश्यक असल्याचे प्रखड मत वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा सहसचिव आर. एस. गायकवाड यांनी केले.
विशेष जनसुक्षा हा कायदा संविधानाने देलेल्या अधिकाराची गळचेपी करणारा आहे. संविधानाने जनतेला सार्वजनिक ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून व व्यक्तीगतपणे मत व्यक्त करण्याची मुभा दिली आहे; परंतु, राज्य सरकार या विधेयकाद्वारे नागरिकांचे अधिकार हिसकावून घेत आहे. यातून राज्य सरकार संविधान विरोधी असल्याचे अधिरोखित होत आहे. यांचा सर्वच विरोधीपक्ष, सामाजिक संघटना आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी संविधानाचे चौकटीत राहून जनता विरोधी असलेला ‘जनसुरक्षा कायदा’ पास होणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून यांचा तीव्रपणे विरोध केला पाहिजे, असे गायकवाड म्हणाले.
संविधाना प्रमाणे योग्य जनहितार्थ सभागृह चालवणे, सभागृहात संविधानाला धरुन कायदे करणे व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी यांना आपण सभागृहात पाठवून दिले आहे; परंतु विद्यमान सरकारने सातत्याने संविधानाची पायमल्ली करून आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. आता चक्क जनतेच्या सुरक्षेतेच्या गोंडस नावाखाली’ विशेष जनसुरक्षा’ हा नवीन कायदा आणून जनतेचा आवाज बंद करण्याचा जोरकस प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षातील कोणी आमदार खासदार माजी मंत्री या विषयावर बोलताना दिसत नाहीत. बोललं तर त्यांच्या मागं चौकशी लावून त्याचा आवाज बंद करण्यात येतो. तोच प्रकार जनते सोबत करण्याचा डाव राज्य सरकारकडून चालवला आहे. त्यामुळे आता शांत बसून चालणार नाही. आपल्याला हक्क व अधिकार संविधानाने दिलेली देणं आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून संवैधानिक मार्गाने लढा देऊया, असे आवाहन त्यांना केले.

