क्राइम

गोंवशीय मांस विक्री करणाऱ्यावर उमरग्यात गुन्हा दाखल

उमरगा: शहरात गोंवशीय मांस विक्री करणाऱ्यावर तिघाविरोधात उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अस्लम महंमद हनीफ कुरेशी (वय ३६ रा. गुंजोटी, ता. उमरगा हा. मु. इंदीरा चौक बिर्याणी गल्ली उमरगा) अस्लम हजीमलंग कुरेशी (वय ३४ रा. महात्मा फुले नगर उमरगा) जहीर रशीद कुरेशी (वय ४८ रा. गुंजोटी, ता. उमरगा) यांनी शुक्रवारी दि. २) रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास शहरातील बिर्याणी गल्ली येथी आप- आपल्या मालकीच्या दुकानामध्ये गोवंशीय जनावराचे पंचवीस किलो मांस अंदाजे चार हजार ५०० किंमतीचे विक्री करण्याच्या उद्देशाने दुकानातील प्लॅस्टीकच्या पोत्यात बांधलेले असताना पोलिसांना मिळून आले. याबाबत पोलीस नाईक इमरान खान हज्जु खान पठाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तीन आरोपीविरुध्द शनिवारी (दि. ३) उमरगा ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि कलम ५ (क), ९ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close