जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाची बाजी

लोहारा (धाराशिव): धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांकाचे विजेतेपद मिळविले आहे. महाविद्यालयाच्या वतीने विजेत्या संघचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धा जिल्हा क्रीडाधिकारी व क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने धाराशिव तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद प्रशाळेच्या क्रीडांगणावर स्पर्धा पार पडल्या. कबड्डीच्या सामन्यात नेताजी सुभाषचंद्रबोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रभावी कामगिरी करीत तीसरे पारितषिक पटकाविले. स्पर्धेत धाराशिव, कळंब, भूम,परांडा, वाशी, तुळजापूर, लोहारा, उमरगा या तालुक्यातील मुलींच्या कबड्डीच्या संघाने भाग घेतला. कळंब येथील मोहेकर महाविद्यालयाने प्रथम मिळविला तर द्वितीय क्रमांक परांडा येथील महाविद्यालयाच्या संघाने मिळविला. धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या कबड्डी संघाने प्राविण्य मिळविल्याबद्दल बारा विद्यार्थ्यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येकी पाच गुणांचा लाभ होणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ठ सांघिक कामगिरीबद्दल नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील यांनी विजयी खेळाडू व क्रीडाविभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे यांचा चषक देऊन सत्कार केला. तसे सुहानी गोरे, दिव्या श्रीगिर, आरती मोरे, प्रांजली क्षीरसागर, पल्लवी रवळे, नम्रता चव्हाण, ऋतुजा शिंदे, मेहेक इनामदार, गीता सूर्यवंशी, प्राची गरड, श्वेता देवकर, प्रतीक्षा भोसले या विजत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव, प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे-पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. पर्यवेक्षक भास्कर जाधव, क्रीडा विभागप्रमुख नागनाथ पांढरे, प्रा. राजेशा आष्टेकर, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, बालाजी इरूदे, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. सुनील बहिरे, दत्ताजी जावळे पाटील, प्रा सचिन शिंदे, काकासाहेब आनंदगावकर, अंकुश शिंदे, , प्रा. ज्ञानदेव शिंदे, श्रीकांत मोरे, संजय जगताप, प्रा. विजय उंबरे, प्रा. मुकुंद रसाळ, प्रा. विद्यासागर गिरी, प्रा. रामचंद्र खुणे, धनराज धनवडे, प्रा. विष्णुदास कलमे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

