शैक्षणिक

डॉ. संजय अस्वले यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार

उमरगा (जि. धाराशिव): महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचा करीअर कट्टा २०२३ चा ‘उत्कृष्ट जिल्हा समन्वयक’ पुरस्कार उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले यांना मुंबई येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला. मुंबई येथील के. जे. सोमय्या विद्यापीठात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. विद्या विहार विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एन. राजशेखरन पिल्लई, नवीन शैक्षणिक धोरण आयोगाचे सदस्य पत्रकार, संपादक उदय निरगुडकर, पॉवर सेक्टर स्कीलचे संचालाक प्रफुल्ल फाटक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे संचालक शंकर जाधव, एमआयटीएसचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा डॉ. संजय अस्वले यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. अस्वले हे करीअर कट्टाचे धाराशिव जिल्ह्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यतील सर्व महाविदयालयात महाराष्ट्र शासनाचा करीअर कट्टा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा धाराशिव जिल्ह्याचा उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार दिला गेला आहे. या यशाबादल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष आश्लेश भैया मोरे, सरचिटणीस जनार्धन साठे, चिटणीस पद्माकरराव हराळकर, सहचिटणीस डॉ. सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही.एस. इंगळे, डॉ. पी.ए. पिटले, प्रबंधक राजकुमार सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे यांच्यासह प्रध्यापकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close