राज्य

समाजाची बदनामी करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा: रिपब्लिकन पक्षाची मागणी

लोहारा (धाराशिव): समाज माध्यमावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकून एका विशिष्ट समाजाला अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या लातूर येथील दिलीप जाधव-पाटील चेरीकर याच्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून दिलीप जाधव-पाटील हा समाज माध्यमावार सतत आक्षेपार्ह व्हिडिओ टाकून दलितामधील एका समाजाला व महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत आहे. त्याच्या या कृत्यामुळे समाजाची मानहानी होत असून महिलांना अपमानीत व्हावे लागत आहे. जातीय तेढ निर्माण करून समाजमन कुलशीत करणाऱ्या समाजकंटाकवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी तक्रारी अर्जात केली आहे. यावेळी रिपाइं रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, रिपाइं तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, काकासाहेब भंडारे, शरद मस्के, बालाजी माटे, संघर्ष सोनवणे, सर्जेराव बनसोडे, किरण वाघमारे, अनिल वाघमारे, दादासाहेब गायकवाड, पुरूषोत्तम सितापुरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close