ईतर

लोहारा तालुक्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन

लोहारा (जि. धाराशिव): लाडक्या गणरायाचे मंगळवारी (ता.१९) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लोहारा शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी व घराघरात उत्साहात आगमन झाले. शहरातील बसवेश्वर गणेश मंडळाने ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढून ‘श्री’ची प्रतिष्ठापणा केली.

सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील भक्तांनी गणपती नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात बालभक्तांमध्ये मोठा उत्साहा होता. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करीत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. सार्वजनिक गणपती मंडळांची मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत तयारी सुरू होती. शहरातील बसवेश्वर गणेश मंडळाने मिरवणूक काढून प्रतिष्ठपणा केली. आझाद चौकातून गणरायाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणू डॉ. आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे काढून पाटोदा रोडवरील सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठपणा करण्यात आली. झांज पथक, लाठी-काठी, लेझीम पथकांनी आपली कला सादर केली. हराळी येथील विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचा खेळ सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी वैजनाथ माणिकशेट्टी, विरेश स्वामी, संतोष फावडे, शहाजी जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

लोहारा पोलिस ठाण्यात ‘श्री’ची प्रतिष्ठापणा…
आपले कर्तव्य बजावण्यात नेहमी व्यग्र रहाणाऱ्या पोलिसांनीही लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात पोलिस ठाणे परिसरात प्रतिष्ठापणा केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एका वाहानातून श्रींच्या मूर्ती नेण्यात आली. यावेळी पोलिस हवलदार हणुमंत पापुलवार, किशोर शेवाळे, सुनील जाधव, गृहरक्षक दलाचे बिलाल गवंडी, मडळूप्पा शेखजी, योगेश परसे, पाशू मुल्ला, सतिश माळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close