शैक्षणिक

प्राचार्य शहाजी जाधव यांना सरपंच परिषदेचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

३ डिसेंबरला पुण्यात पुरस्काराचे वितरण

लोहारा (जि. धाराशिव): सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा “आदर्श शिक्षक” पुरस्कार येथील प्राचार्य शहाजी महावीर जाधव यांना जाहीर झाला आहे. सरपंच परिषदेकडून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राचार्य जाधव यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सरपंच परिषदेच्या निवड समितीने केली आहे. पुणे येथील यशवंतराव चव्हाण ज्ञानप्रबोधिनीच्या (यशदा) सभागृहात तीन डिसेंबर रोजी ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन, खासदार श्रीकांतजी शिंदे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथजी डवले, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्काराचे वितरण होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा सारख्या भागामध्ये न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम घेत या भागातील सामाजिक कार्यात सहभागी होवून आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. अल्पावधीतच नावलौकीक प्राप्त केले आहे. दहा वर्षात आपल्या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे उस्मानाबाद एज्यूकेशन सोसायटी गुंजोटी (ता.उमरगा) संचलित न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहाराचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य शहाजी महावीर जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते ” राज्यस्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शहाजी जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले, उपाध्यक्ष श्री बालाजी जाधव, संचालिका सुनीता गायकवाड, माधुरी चोबे, सविता जाधव, स्कुलचे पर्यवेक्षक, प्रा. यशवंत चंदनशिवे, सिध्देश्वर सुरवसे, अरुण सारंग, सतिश गिरी, शिवराज झिंगाडे, श्रीनिवास माळी, बालाजी बिराजदार, रमेश वाघुले यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी मित्र परिवार या सर्वांनी अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close