शैक्षणिक

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुजारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप

अचलेर (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास विद्यालयातील ६४६ विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप पुजारी यांच्याकडून मोफत ओळखपत्र वाटप करण्यात आले.ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेसाठी आपले योगदान राहिले पाहिजे या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष सोलंकर होते. यावेळी अनिल सोमवंशी, पृथ्वीराज पाटील, डॉ. डी. एम. पाटील, राजेंद्र पाटील, ग्रामसेवक कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुजारी, तंटामुक्त अध्यक्ष हरिभाऊ पुजारी, पत्रकार अनिल कासार, ग्रामपंचायत सदस्य अमोल पुजारी, लखन चव्हाण, मयूर पुजारी, विष्णू लोहार, प्रकाश पुजारी, किरण पुजारी, नरेश पुजारी, ज्ञानेश्वर पुजारी, मुख्याध्यापक, सतीश जाधव यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम भालके यांनी केले. आभार सोमनाथ धड्डे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close