धाराशिव येथे कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात

धाराशिव: महावितरण कार्यालयातमध्ये गुरूवारी १२ ऑक्टोंबर रोजी कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. धाराशिव येथील मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, महावितरण सर्कल कार्यालयाच्या वतीने कौशल्य दीक्षांत समारंभाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपव्यवस्थापक बो. व्ही. मेथेवाड होते. यावेळी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार संतोष कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरण कार्यालयाअंतर्गत यशस्वीरित्या पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या ५२ प्रशिक्षणार्थ्यांना दीक्षांत समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. महावितरण कार्यालयाचे उच्चस्तर लिपीक एस. एस. दुधभाते यांनी सूत्रसंचालन केले. उपव्यवस्थापक डी. एम. सुरवसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी आर. के. पोतदार, पी.जी.भोकरे, जी. एम. माळी यांनी पुढाकार घेतला. यावेळी सन २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेले शिकाऊ उमेदवार उपिस्थत होते.




