
लोहारा (जि. धाराशिव): उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यां गद्दारांना येणाऱ्या विधानसभेत त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी केले. लोहारा शहरात आयोजित शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. उद्वव ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्यभर भगवा सप्तहा साजरा केला जात आहे. मेळावे, बैठका घेत सप्ताहनिमित्ताच्या माध्यमातून दस्य नोंदणी, मतदार नोंदणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरातील स्वरांजील हॉलमध्ये लोहारा तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ज्येष्ठ नेते बााबा पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख शेखर पाटील, शहरप्रमुख सलीम शेख, अशोकराजे सरवदे, प्रा. संजय कांबळे, विलास व्हटकर, सातलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. संपर्कप्रमुख काटमोरे बोलताना म्हणाले की, उमरगा-लोहारा तालुका हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनचा बालेकिल्ला आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेतून निघून पक्षाची बेईमानी केलेल्यांना त्यांची जागा दाखवण्याचा व उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, तेव्हा शिवसैनिकांनी गाफील न राहाता एक दिलाने काम करावे, असे आवाहन केले. अशोकराजे सरवदे म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातल्या अविकसित लोहारा तालुक्याकडे लक्ष देऊन त्याला विकासाकडे आणण्याच्या दृष्टीने या तालुक्यातील उमेदवारांना येणाऱ्या विधानसभेची उमेदवारी द्यावी कारण याच तालुक्यातून सातत्याने शिवसेनेला प्रचंड मोठी लीड मिळालेली आहे, परंतु गेल्या ७० वर्षांपासून या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले असल्याचे सांगूनआज पहिल्यांदाच या तालुक्यातील उमेदवार म्हणून पुढे येत असताना या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळावे, जेणेकरून विकासाचा समतोल राखता येईल अशी मागणी अशोकराजे सरवदे यांनी यावेळी केली. यावेळी लोहारा तालुक्यातील शिवसेनेची वाटचाल, त्यांच्या पुढे असणाऱ्या अडचणी आणि यातूनही या तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी, इतर घटक पक्षांनी आणि जनतेने घेतलेले परिश्रम या सर्वांचे यश म्हणजे गेल्या लोकसभेचा निकाल आहे. असे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली असल्याची ग्वाही तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी संपर्कप्रुख काटमोरे यांना दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शहरप्रमुख सलीम शेख, माजी सभापती विलास भंडारे, शिवदूत पंडित बारगळ, महेबूब गवंडी, श्याम नारायणकर, गोपाळ गोरे, पिंटू गोरे, रघुवीर घोडके, बालाजी जाधव, कुंडलिक सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लोभे, दत्ता पाटील, ज्ञानेश्वर भुजबळ, अहमद पटेल, सुभाष बिराजदार, नितीन सूर्यवंशी, केशव सरवदे, बंकट माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.





