डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याती विटंबना केल्याच्या निषेधार्थ सास्तूर गाव बंद

लोहारा(जि. धाराशिव): कर्नाटक येथे काही समाजकंटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील सास्तूर येथील ग्रामस्थांनी शनिवारी (ता. २७) बंद पाळण्यात आला. या बंदमुळे आज दिवसभर बाजरपेठेत शुकशुकाट होता.
कर्नाटक राज्यातील कलबुर्गी शहरामध्ये असलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केल्याची घटना बुधवारी (ता. २३) घडली आहे. निंदनीय प्रकारामुळे आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील ग्रामस्थांनी शनिवारी गाव बंद ठेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी केली. दरम्यान, येथील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्यात येत असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाला निवेदन दिले होते. गावातील व्यापाऱ्यांनाही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार व्यापारी, दुकांनदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर आपली दुकाने दिवसभर बंद ठेवली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. यावेळी मेजर विष्णू वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे, आशिष वाघमारे, काकासाहेब गायकवाड, आकाश वाघमारे, सुबोध वाघमारे, किशोर कोकणे, प्रदीप कोकणे, अमोल तुंगे, आदित्य वाघमारे, सुहास वाघमारे, प्रदीप लोंढे, खाजू शेख, अंकुश इगवे, सचिन इगवे, सौदागर सरवदे, पिंटू इगवे, धोंडीराम लोंढे, प्रकाश लोंढे, देविदास वाघमारे, बाबा गायकवाड, दिगंबर वाघमारे यांनी पुढाकार घेतला.

