ईतर

युवा सरपंच चंद्रशेखर पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

अतनूर (जि. लातूर): जळकोट तालुक्यातील अतनूर ग्रामपंचायतीचे युवा सरपंच चंद्रशेखर अशोकराव पाटील यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदतर्फे देण्यात येणारा “समाजरत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे. चंद्रशेखर पाटील यांनी सरपंचपदाबरोबच समाजिक कार्यामध्ये मानाचे स्थान निर्माण केल आहे. आपल्या कार्यकालामधे अनेक लोकांना शैक्षणिक, सामाजिक व अर्थिक मदत सतत्याने करीत आहेत. गावच्या सर्वांगिण विकास कामासाठी अहोरात्र झटत असतात. विविध कल्याणकारी योजना राबऊन गाव परिसराचा विकास करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. त्यांनी अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व धर्माच्या सण, उत्सवात सहभाग घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांच्या या समाजिक कार्याची दखल घेवून महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. रविवारी ( दि. २४ डिसेंबर) लातूर येथील कै. दगडोजीराव देशमुख सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सरपंच चंद्रशेखर पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यमंञी संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, माजी सैनिक शेख आयुब, इस्माईल मुंजेवार, अर्जुन आगलावे, विठ्ठलराव चव्हाण, प्रमोद संगेवार, बाबू कापसे, दिलीप कोकणे, विकास सोमुसे, रौफ मुंजेवार, ईश्वर कुलकर्णी, गणेश गायकवाड, राहुल गायकवाड यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close