ईतर

ज्योतीबा फुले स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सुधीर कोरे सन्मानित

लोहारा (जि. धाराशिव): उमरगा येथे आयोजित पुरस्कार गौरव सोहळ्यात जेवळी येथील सकाळचे पत्रकार सुधीर कोरे यांना महात्मा ज्योतीबा फुले स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उमरगा येथील स्मृतिशेष रामलिंग वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांना महात्मा ज्योतीबा फुले स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या ग्रामीण पत्रकारिता पुरस्कारासाठी लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सकाळचे पत्रकार सुधीर कोरे यांची निवड करण्यात आली. उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात रविवारी (ता. २४) पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मल्लिनाथ मलंग होते. साहित्यीक, कवी इंद्रजित भालेराव, विश्वनाथ महाजन, सुभाष वैरागकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकार सुधीर कोरे यांना कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर इंद्रजि भालेराव यांना कार्यगौरव, विश्वनाथ मलंग यांना जीवनगौरव पुरस्कार, देविदास सौदागर यांना साहित्य पुरस्कार, दयानंद जंगम यांना अधिकारी पुरस्कार, सुनिता पावशेरे यांना सरपंच पुरस्कार, नितीन होले यांना उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी नागरिकांची उपस्थिती मोठी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close