‘हैद्राबाद मुक्ती संग्राम’ पुस्तकाचे मोठ्या थाटात प्रकाशन!

धाराशिव: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्यसाधून मंगळवारी (दि. १७) लोहारा शहरातील लोहारा हायस्कूलचे शिक्षक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी, साहित्यिक बाबुराव पिराजी माळी यांच्या’ हैद्राबाद मुक्ती संग्राम’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. धाराशिव तालुक्यातील पाटोदा येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत काळे होते. यावेळी इतिहास तज्ञ भाऊसाहेब उमाटे, साहित्यिक विश्वास धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बागल, पुस्तकाचे लेखक बाबुराव माळी, डॉ. अविनाश ढगे, दिलीप चव्हाण पुणे, मुख पृष्ठकार विनोद गोयर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबुराव माळी लिखित ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बाबासाहेब उमाटे म्हणाले की, या पुस्तकामुळे येणाऱ्या तरूण पिढीला हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याच्या इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होईल, असे सांगून त्यांनी इतिहासाच पट उघडला. यावेळी विश्वास धुमाळ, डॉ. अविनाश ढगे, भारत काळे, आर. व्ही. माळी यांनी मनोगत व्यक्त केले. बाबुराव माळी यांनी पुस्तका विषयी माहिती प्रास्ताविकेतून दिली. त्यानंतर राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्द आर. व्ही. माळी तसेच हैद्राबाद मुक्ती संग्राम पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्र रेखाटणारे चित्रकार विनोद गोयर यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक कमलाकर सावंत (औसा), लोहारा हायस्कूलचे माजी शिक्षक करणसिंह बायस, वसंत क्षीरसागर, हेमंत जेवळीकर, महालिंग स्वामी, त्र्यंबक जाधव, मेजर कालिदास क्षीरसागर, रमेश ठेले, राम लांडगे, विद्या विकास प्रतिष्ठानचे वफा मणियार, वसंत ठेले, चंद्रकांत क्षीरसागर, महेश क्षीरसागर, चंद्रकांत विभूते, अॅड. राजेंद्र पाटील, दाजी कांबळे, अण्णाराव भूसणे, सुरेश माळी, मनोरथ भोजने, वामन बिराजदार, रुपाली माळी, कविता भोसले, गीता माळी, संध्या माळी, विद्या माळी, अनिता भोजणेआदी उपस्थित होते.

