ईतर

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पोलिस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीला सुरुवात

मुरुम (जि.धाराशिव): करिअर कट्टा एक्सलन्स सेंटर महाविद्यालय म्हणून निवड झालेल्या उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पोलिस व आर्मी भरती पूर्वप्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांच्या शुभहस्ते प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांना प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहित्या केंद्र आयोजित करेल कथेच्या वतीने कट्टाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलिस आणि आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आलीआहे. पुणे येथील यशदा प्रशिक्षण केंद्रामध्ये युवा धोरण निश्चिती आणि पोलिस प्रशिक्षण केंद्राचे दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील निवडक सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयामध्ये करिअर कट्ट्याच्या वतीने पोलिस प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी उमरगा छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अस्वले आणि समन्वयक डॉ. ए. के. कटके, डॉ. सी. डी. करे आणि पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक मद्रे यांची उपस्थिती होती. यावेळी करीअर कट्टा नागपूर जिल्हा समन्वयक डॉ. रंजना जीवने, बीड जिल्हा समन्वयक डॉ. नरसाळे यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सुरू असलेल्या पोलिस व आर्मी भरती पूर्वप्रशिक्षण अकॅडमी मध्ये ७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या अकॅडमी मध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी फिजिकल प्रशिक्षण आणि दुपारी लेखी परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तसेच करियर कट्ट्याचे ऑनलाईन लेक्चर संध्याकाळी उपलब्ध आहे. मुलींसाठी वस्तीगृहाची स्वतंत्र सोय आहे. तरी अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यावा, असे आव्हान प्राचार्य आणि करिअर कट्टा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close