शैक्षणिक

प्रा. व्यंकट चिकटे यांना पीएचडी पदवी प्रदान

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. व्यंकट चिकटे यांना रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. चिकटे यांनी “महात्मा गांधी यांच्या विचार व कार्याचा निवडक आंतरराष्ट्रीय व्यक्तीवरील प्रभाव (1915 ते 2015)” या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठात सादर केला होता. त्यांना पीएचडी पदवी प्रदान केली. नळेगागाव येथील शिव जागृती महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.ओमशिवा लिगाडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यापीठाचे बाह्य परीक्षक म्हणून डॉ. वीरेंद्रसिंग बैस उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य दौलतराव घोलकर, डॉ. विरभद्रेश्वर स्वामी, डॉ.प्रवीण जगताप, डॉ. रमेश राठोड, प्रा. देविदास चव्हाण, डॉ. प्रभाकर गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close