मराठा आरक्षणासाठी होळी, तावशीगड कडकडीत बंद: टायर जाळून सरकारचा केला निषेध

लोहारा (जि. धाराशिव): मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सारटी या ठिकाणी मनोज जरांगे प्राणांतिक उपोषण करीत आहेत. त्यातच माडज येथील किसन माने या तरूणाने आरक्षणासाठी तलावात उडी मारून आत्महत्या केली. याचे राज्यासह गावखेड्यापर्यंत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. लोहारा तालुक्यातील होळी, तावशीगड येथे गाव बंद ठेऊन ग्रामस्थांनी तत्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे. प्राणांतिक उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी होळी गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनाही सुट्टी देण्यात आली. त्यानंतर आरक्षणासाठी बळी गेलेल्या किसन माने यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी संजय मनाळे, करण बाबळसुरे, प्रदीप मोरे, केशव सरवदे, व्यंकट माळी, ओम बिराजदार, अनिल गायकवाड, बालाजी मडोळे, भाऊसाहेब मोरे, अभिषेक जाधव, पवन मोरे, पृथ्वीराज औरादे, विश्वनाथ जाधव, बजरंग जाधव, दिगंबर पवार, नरेंद्र कांबळे, श्रीमंत जाधव, विठ्ठल भोसले, रोहन जाधव, अविनाश जाधव,नितीन जाधव,आदेश गायकवाड,
तालुक्यातील तावशीगड येथेही ग्रामस्थांनी कडकडीत गावबंद ठेऊन आरक्षण लागू करण्याची मागणी लावून धरली. तावशीगड चौकात किसन माने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी टायर जाळून घोषणाबाजी केली. रोहन बिराजदार, महादेव यादव, राजपाल पाटील, किशोर बिराजदार, शिवाजी बिराजदार, आकाश मारेकर, साहेबराव बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, गणेश इंगळे, प्रतीक बिराजदार, श्यामा बिराजदार, समर्थ जाधव, ओमा बिराजदार, शैलेश बिराजदार, चेतन खुणे, महेश खुणे, अमोल कोरे, कृष्णा बिराजदार, नागनाथ राऊत, अतुल फुरडे, रितेश कोराळे, समर्थ जोगी आदी उपस्थित होते.





