ईतर

श्रेयश लोहार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

लोहारा (धाराशिव): हल्ली धुमधडाक्यात वाढदिवस साजर करून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. यातून श्रीमंतीचा बडेजाव दाखविण्याचा काहींचा प्रयत्न असतो. परंतु, तालुक्यातील वडगाव येथील पोलिस पाटील मारुती लोहार याचे ज्येष्ठ चिरंजीव श्रेयश लोहार यांनी मात्र आपल्या १७ व्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळला. या रकमेतून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मार्डीे येथील निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रविवारी (ता.२०) शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक नेताजी सोमवंशी, बाळू मुळे, राहुल चव्हाण, शिवप्रसाद होंडराव, ओमकार स्वामी, जिशान जमादार, रिहान सुंबेकर, इरफान बागवान, गौरव पाटील, आदित्य चौगुले, वैभव पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close