ईतर

माकणी करजगाव येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेची तयारी; शंभर जेसीबींने फुलांची उधळण करून स्वागत करणार

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथे ११ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होत आहे. त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सभामंडप उभारणीसह अन्य कामेही अंतिम टप्प्यात आहेत. सभा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असू, त्यांच्यामाध्यमातून सभेचे नियोजन करण्यात येत आहे. सुमारे शंभर जेसीबींद्वारे मनोज जरांगे यांच्यावर फुलांची उधळण करून स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मैदानावर ३० बाय ३० आकाराचे स्टेज तसेच १०० फुटाचे रॅम्प तयार करण्यात येत आहे. यावेळी जरांगे यांची माकणी येथून सभास्थळापर्यंत उघड्या कारमधून रॅली काढण्यात येणार आहे. सभेसाठी मोठ्या संख्येने आलेलेल्या मराठा समाजबांधवांच्या वाहनाची पार्किंग व्यवस्था केली आहे. यासाठी माकणीतील सिद्धेश्वर मंदिर, लोहारा रस्ता, भारत विद्यालय करजगाव गावात व इतर अन्य ठिकाणी वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मैदान परिसरात तात्पुरत्या शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महिला व पुरुषांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, सभेसाठी आलेल्या नागरिकांसाठी चहा, पाणी, नाश्त्याचीही सोय केली असून, मुस्लीम बांधवांकडून जागोजागी पाण्याची सोय करण्यात येणार आहे. सभेला एक लाख मराठा समाज बांधव उपस्थित राहतील, असा अंदाज असून, त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. शहरात व मैदान परिसरात जागोजागी कोअर कमिटीच्या वतीने बॅनर्स लावण्यात येणार आहेत. गर्दीवर शिस्तपालन करण्यासाठी एक हजार स्वयंसेवक नेमण्यात येणार असून, वैद्यकीय पथक तैनात राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close