ईतर
माधवराव पाटील महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

- मुरूम (जि. धाराशिव) : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शुक्रवारी (ता.२३) संत गाडगेबाबा यांची १४८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी ‘संत गाडगेबाबा व्यक्ति आणि विचार’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक बावगे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. अविनाश मुळे यांनी केले. डॉ. राजू शेख यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. महेश मोटे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. मुकूंद धुळेकर, डॉ. नरसिंग कदम, डॉ. अरुण बावा, डॉ. रमेश आडे, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. अरविंद बिराजदार, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. नाना बेंडकाळे, राजू ढगे, सुरेखा पाटील, दत्तु गडवे, आनंद वाघमोडे, राजानंद स्वामी, लालअहमद जेवळे, श्रावण कोकणे, इसाली चाऊस आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





