तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश सूर्यवंशी; उपाध्यक्षपदी अशोक रुपनूर यांची बिनविरोध निवड

मुरुम (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील बोळेगांव येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी अशोक रुपनूर यांची बिनविरोध निवड झाली. बोळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेत बुधवारी (ता.४) रोजी आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास पाटील होते. झालेल्या बैठकीत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी करण्यात आल्या. तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी अशोक रुपनूर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सरपंच विलास पाटील, उपसरपंच शांतप्पा मुलगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सदस्य सुनील सूर्यवंशी, अंकुश रूपनूर, रामलिंग गायकवाड, मल्हारी रूपनूर आदींची प्रमुख उपस्थित होती. प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, ग्रामसेवक लक्ष्मण कांबळे, पोलिस पाटील कडाजी सूर्यवंशी, बालाजी रुपनूर, रामलिंग गायकवाड, राहुल सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

