चिंतामणी गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर

लोहारा (जि.धाराशिव): गणेशोत्सव अगदी जवळ येत असल्याने तरूण मंडळे गणेश उत्सवाच्या जय्यत तयारीला लागले आहेत. उत्सव धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील चिंतामणी गणेश मित्र मंडळाने नूतन कार्यकरणी जाहीर केली आहे. चिंतामणी मंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत चिंतामणी गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सुरज माळवदकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विनायक वेदपाठक, सचिवपदी प्रशांत थोरात, मिरवणूक प्रमुख गणेश पालके, विशाल मिटकरी यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. या बैठकीस जयसिंग बंडगर, रमेश बंडगर, रामेश्वर मिटकरी, संगमेश्वर मिटकरी, रोहन मिटकरी, प्रसाद मिटकरी, प्रशांत शेटगार, शिवप्रसाद होंडराव, व्यंकटेश घोडके, प्रकाश होंडराव, ओंकार घोंगडे, प्रशांत बंडगर, शंभू वाले, कपिल मशाळकर, शिवकुमार जट्टे, गणेश हिप्परगे, महेश फरीदाबादकर, भैय्या पटवारी, नितीन रोडगे, संतोष माळवदकर, विकास पांढरे, दत्ता लोहार यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

