
उमरगा (जि. धाराशिव): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सामाजिक गुणगौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात २९ सप्टेंबर रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिली.
दि. १ ऑगष्ट ते ३१ ऑगष्टदरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करून समाज प्रोबधन करणाऱ्या जयंती मंडळांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना बहुजन रयत परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड राहणार आहेत. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंके या प्रमुखमार्गदर्शक असतील. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी सभापती जितेंद्र शंदेे, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, पत्रकार धनंजय रणदिवे, तहसीलदार, गोविंद येरमे, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, माजी समाज-कल्याण सभापती हरिष डावरे, माजी बांधकाम सभापती अभय चालुक्य, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, भाजप युवा नेते शरण पाटील, डीवायएसपी एन. जी. गायकवाड, अण्णाभाऊ साठे महामंडाळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील क्षीरसागर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापक पोपट झोंबाडे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, दिलीप गायकवाड, शाखा अभियंता राजेंद्र माळी, चेअरमन दिलीप तेलंग, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्ष ईश्वर क्षीरसागर असतील. या गौरव पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

