केदार घोंगडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अन्नदानाचे वाटप

लोहारा (जि. धाराशिव): स्वर्गीय केदार मल्लिनाथ घोंगडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त तुळजा भवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तगणांना अल्पोहार, जेवणाचे वाटप करण्यात आले. शहरातील युवक केदार घोंगडे यांचे गत वर्षी आकस्मित निधन झाले. त्यांचा आज शनिवारी (दि. ५) प्रथम स्मतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित मल्लिनाथ घोंगडे परिवारांकडून अन्नदान वाटपाचे आयोजन तळजाई अन्नक्षेत्रामध्ये करण्यात आले होते. प्रारंभी आई तुळजा भवानीच्या प्रतिमेचे पूजन के. डी. पाटील, युवा शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पायी जाणाऱ्या भक्तांना अल्पोहार, जेवणाचे वाटप करण्यात आले. यावेळी बसवराज पाटील, मल्लिनाथ घोंगडे, मारूती वाघ, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, रघुवीर घोडके, गोपाळ संदीकर, पत्रकार बालाजी बिराजदार, गणेश खबोले, विक्रांत संगशेट्टी, कल्याण ढगे, दत्ता वाघ, सुमित झिंगाडे, मल्लिकार्जून पाटील, भागवत गरड, ओंकार घोंगडे आदी उपस्थित होते.





