आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील मुर्शदपूर येथील विविध विकास कामाचा शुभारंभ व झालेल्या कामाचा लोकार्पण आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्ञानज्योती संस्थेकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुर्शदपूर येथील रस्ते बांधकामासाठी आमदार चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या रस्ते बांधकामाचा शुभारंभ आमदार चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी दहा लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या महादेव मंदिर सभामंडपाचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर उमरगा येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमरगा शहरप्रमुख योगेश तपसाळे, सरपंच बळवंत पाटील, उपसरपंच संगीता माने, महादेव बलसुरे, युवराज पाटील, पोलिस पाटील मनीषा चाकुरे, पवन मोरे, अंगद सूर्यवंशी, तुळशीराम पवार, महेश पाटील, माजी सैनिक संजय मोरे, भागवत आनंदगावकर, फजल कादरी, बालेपीर शेख, गोरखनाथ मुर्टे, दिलीप बेंडगे, काकासाहेब चव्हाण, तुकाराम जाधव, लायक साहेब कादरी, बालाजी पवार, श्याम बनसोडे, प्रदीप मोरे, शंकर मोरे, पांडुरंग महाराज, शाखाप्रमुख शेखर पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी महेश घोडके, रितेश चेंडकाळे, विजयकुमार देशमुख, रोहन माने, समीर घोडके, योगेश घोडके, स्वप्नील घोडके, पृथ्वीराज गोबाडे, रवी बलसुरे, चैतन्य मोरे,, श्रीकांत मोरे, रुपेश गोबाडे, करण खरोसे, किरण खरोसे उपस्थित होते.





