Uncategorized
पालावरील चिमुकल्यांसोबत साजरा केला वाढदिवस

लोहारा (जि. धाराशिव): शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे संस्थापक तथा प्राचार्य शहाजी महावीर जाधव यांनी आपला वाढदिवस पालावरील चिमुकल्यांसोबत साजरी केला. यावेळी वाढदिवस व गुढी पाडव्याच्या निमित्ताने पालामध्ये राहाणाऱ्या मुलांना कपडे, खाऊ वाटप करण्यात आले. लोहारातील भारतमाता मंदिर जवळ मसणजोगी व भटक्या जमातीच्या लोकांची वस्ती आहे. या वस्तीमधील लहान चिमुकल्यासोबत त्यानी आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी जनकल्यांणचे शंकर जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे, दत्तात्रय पोतदार, वीरेश स्वामी, व्यंकटेश पोतदार आदी उपस्थित होते.

