ईतर
दसरा सणानिमित्त वाले परिवारांकडून महिलांना साड्यांचे वाटप

लोहारा (जि. धाराशिव) शहरातील वाले अॅटोमोबाईल्स बजाज शोरुम, अनिल प्रोव्हिजनच्या वतीने दसरा सणाच्या पार्श्वभूमिवर तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या महिला भाविकांना साड्यांचे वाटप करण्यात आले. भवानी मातेचे श्रध्दापूर्वक दर्शन घेण्यासाठी सामान्य कुटुंबांतील महिला भाविक मोठ्या संख्येने जातात. समाजाप्रती काही तरी देणे लागतो. या जाणिवेतून सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर राहणारे लोहारा शहरातील अॅटोमोबाईल्स बजाज शोरुम, अनिल प्रोव्हिजनचे मालक सुनील वाले, अनिल वाले यांच्या वतीने शेकडो महिला भाविकांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील वाले, सुरज थोरात, अनिल वाले, विरभभद्र वाले, श्रेयश वाले, शांतेश्वर दलाल, प्रेम बनसोडे, रोहीत जोकार, अदी उपस्थित होते.

