सामाजिक

जळकोट येथे मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन

जळकोट (जि. धाराशिव): केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने ता. १९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे कोणाला मोतीबिंदूचा आजार असेल तर त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून मोफत शस्त्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान अंतर्गत धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी जाधव यांच्या सहकार्याने ता. २५ फेब्रुवारी( रविवार) सकाळी नऊ वाजता नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तत्पूर्वी बुधवारी (ता. २१ ) चिकुंद्रा येथे सरपंच सोनाली कानडे व डॉ. शेख समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. ता. २२ फेब्रुवारी (गुरुवार) नंदगाव येथे उपसरपंच वैभव पाटील व शिवजन्मोत्सव समिती यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. ता २३ फेब्रुवारी (शुक्रवार) उपकेंद्र होर्टी येथे नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. ता. २४ फेब्रुवारी (शनिवार) जळकोट येथील पत्रकार बांधव यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट येथे नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणी परिसरातील रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपल्या मोतीबिंदूची तपासणी करून घ्यावी व आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया ता. २५ फेब्रुवारी नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत शस्त्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे नेत्रचिकित्सा अधिकारी आनंद काटकर, नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कदम, जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रोहिणी जाधव व जळकोट येथील पत्रकार संजय रेणुके, अरुण लोखंडे, सुनील माळगे, मेघराज किलजे, सतीश पिसे, संजय पिसे, विजय पिसे, बसवराज होनाजे आदी पत्रकारांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close