राज्य

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जेवळीत कॅन्डल मार्च

लोहारा (जि. धाराशिव): मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सकल मराठा समाजाने कॅन्डल मार्च काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी जरांगे यांनी आरक्षण मंजूर करण्यासाठी राज्य सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेट दिला होता. परंतु, दुटप्पी धोरण, वेळ काढूपणा व वारंवार मराठा समाजाची करण्यात आलेली दिशाभूल पाहता राज्य सरकारच्या गलिच्छ कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लोहारा तालुक्यातही आरक्षण मागणीचे तीव्र पडसाद उमटत असून जेवळी येथील नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून निषेथ व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, जेवळी येथे बेमुदत उपोषणकर्ते प्रकाश लक्ष्मण बिराजदार यांनी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर टिका केली. दिवसेंदिवस मराठा समाजाच्या आरक्षणबाबतीत राज्य सरकारची चाललेली चालढकल, जरांगे यांची खालावत चाललेली प्रकृती व राज्यभरात आत्महत्या करणारे नवतरूण या विषयी राज्य सरकार कदापी गंभीर नसल्याचा आरोप करून दुटप्पी धोरण राबवून झोपेचे सोंग घेवून वाटचाल करणाऱ्या सरकारने जागे व्हावे, अन्यथा भविष्यातील घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना फक्त आणि फक्त राज्य सरकारच जबाबदार राहील, असे ते म्हणाले. साखळी उपोषणास सुभाष बिराजदार, संतोष मधुकर बिराजदार, संतोष पाटील, राहुल बिराजदार, ज्ञानदेव बिराजदार, धनराज बिराजदार, चेतन शिंदे, प्रदीप पाटील, सुनील चव्हाण, माणिक सुरवसे, दत्तात्रय बिराजदार, पांडुरंग पाटील, रमेश पाटील, रणवीर पाटील, धोंडीराम सुरवसे, नयन बिराजदार, गणेश बिराजदार, सचिन बिराजदार, बालाजी साळुंखे, आप्पाराव गायकवाड यांच्यासह युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close