राज्य

धानुरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेस मारले जोडे

लोहारा (जि. धाराशिव): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकती खालावत असतानाही राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने तालुक्यातील धानुरी येथील संतप्त झालेल्या मराठा समाज बांधवांनी सोमवारी (ता. ३०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला. मराठा आरक्षण योद्धा मनोज जंरागे यांना पाठिंबा देण्यासाठी धानुरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, आकाश जाधव, रोहित साळुंके सहभागी झाले आहेत. दरम्यान, धानुरी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना गावबंदी, मतदानावर बहिष्कार, कॅन्डल मार्च आदींबाबत ठराव संमत करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात चालढकल केली जात असल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. यावेळी उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, आकाश जाधव, गणेश साळुंके, यशवंत बुवा, सूरज साळुंके, राहुल जाधव, शफिक शेख, नारायण साळुंके, रोहित साळूंके, बालाजी साळुंके, तिरुपती साळुंके, तानाजी साळुंके, अजीत मुसाडे, सचिन तिगाडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close