सामाजिक
सुधी कोरे यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर

धाराशिव: उमरगा येथील स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा “महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता” पुरस्कार लोहारा तालुक्यातील जेवळी येथील पत्रकार सुधीर कोरे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. सुधीर कोरे मागील वीस वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विषयावर सातत्याने लिहितात. ग्रामीण भागातील एक सच्चा, निर्भिड व प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. या पुरस्काराचे वितरण २८ डिसेंबर रोजी उमरगा येथे होणार आहे.

