ईतर
मुळजच्या नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सातलिंग स्वामी यांनी केला सत्कार

जळकोट(जि.धाराशिव): उमरगा तालुक्यातील मुळज येथील सरपंचपदी शिवकन्या महेश शिंदे तर उपसरपंचपदी अमोल अरुण अंबुलगे यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी मुळज येथे येथोचित सत्कार केला. यावेळी आईतुळजाभवानी प्रतीमा भेट दिली. याप्रसंगी मुळजचे शिवसेना शाखाप्रमुख दीपक चव्हाण, दयानंद पाटील, अमोल गंगथडे, अनिल दंडगुले, शिवाजी कोकळे, संगमेश्वर स्वामी, श्रीकर बिराजदार, किशोर माडजे, गंगाधर गुंजले, गोविंद पाटील, जळकोट येथील पत्रकार संजय रेणुके, भिमाशंकर यादगौडा यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

