उसणे पैसे देण्याच्या कारणावरून एकाचे नाक फोडले: हिप्परगा रवा येथील घटना

लोहारा (जि. धाराशिव): उसणे पैसे देण्याच्या कारणावरून एका तरूणाचे नाक फोडल्याची घटना लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीविरूध्द लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील आरोपी गणेश इंद्रजित नरगाळे याने २३ जानेवारी रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास गावातीलच स्वामी रामानंद तीर्थ शाळे जवळ नंदु लक्ष्मण सोमवंशी (वय 32) या तरूणास उसणे पैसे देण्याच्या कारणावरून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या झालेल्या बेदम मारहाणीत नंदू सोमवंशी यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरनी नाकाचे हाड फॅक्चर झाल्याचे सांगितले. याप्रकरणी नंदू सोमवंशी यांनी २६ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गणेश नगराळे यांच्या विरोधात लोहारा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११७ (२), (५), ११५ (२), ३५२ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

