शैक्षणिक

सहायक सहकार अधिकारीपदी निवडीबद्दल राणी सूर्यवंशी यांचा सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील मोघा खुर्द येथील राणी सूर्यवंशी यांची कोकण विभागात सहायक सहकार अधिकारीपदी नियुत्ती झाल्याबद्द ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेत शिवजयंतीनमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार गरगडे होते. यावेळी उपसरपंच वंदना गरगडे, सहशिक्षक महादेव कुंभार एकलव्य वाचनालयाचे अध्यक्ष मोहन गोरे, ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ मत्ते, बब्रुवान भोंडवे, आनंदा हिरवे, तुकाराम भोंडवे, उत्तम बोंडगे यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सहायक सहकार अधिकारी राणी सूर्यवंशी व त्यांचे वडील सत्यवान सूर्यवंशी यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना राणी यांनी शिक्षणाचे महत्व, पालकांची जबाबदारी, विद्याथ्यांचे कर्तव्य, मी कशी घडले. यावर पालक, विद्याथ्यांना मार्गदर्शन करुन यापुढील काळात मोघा खुर्द येथील एक होतकरु मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अंगद भोंडवे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवहरी दळवे, मारुती भोंडवे, गंगाराम भोंडवे, बालाजी बाबळे, दादा पवार, बालाजी सोनटक्के, संजय भोंडवे, योगेश गोरे, विनायक गरगडे, गोपाळ गोरे, विनायक दळवे, बबन भोंडवे, महादेव पाटील, हमीद मुजावर, सुरेखा भोंडवे, वैशाली गरगडे, शैला गोरे, मनिषा गोरे, रेखा दळवे, कालिंदा मत्ते, गिता सुर्यवंशी, गुंडूबाई मोहीते, रैसा मुजावर, यांच्यासह पालक, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके यांनी आपल्या गावातून आधिकारी, कर्मचारी निर्माण व्हावेत यासाठी पालक, गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेवून शाळेच्या विकासाला हातभार लावत शाळेला मदत करावी, असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close