सराफ व सुवर्णकार संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष दत्ता माळी यांचा लोहाऱ्यात सत्कार

लोहारा (धाराशिव): धाराशिव जिल्हा सराफ व सुवर्णकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका सराफ, सुवर्णकार संघटनेच्या वतीने दत्ता माळी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जिजाऊ सभागृहामध्ये गुरूवारी (दि. २६) सायंकाळी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अभिमान खराडे होते. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, तालुकाध्यक्ष संभाजी पोतदार, मयूर जालनेकर, कृष्णा डहाळे, सचिदांनद पोतदार, मोहन पोतदार, सचिन दीक्षीत, किशोर महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नूतन जिल्हाध्यक्ष दत्ता माळी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माझ्यावर विश्वास टाकून जिल्हा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याला पात्र राहीन. जिल्ह्याती सरफा, सुवर्णकाराच्या ज्या काही समस्या आहेत. त्या सोडविण्याचा मी प्रामाणिकपणे काम करेन, अशी गवाही त्यांनी दिली. यावेळी माजी नगरसेक श्रीनिवास फुलसुंदर, अहेमद शेख, शहराध्यक्ष भरत कदम कानेगांवकर, गजानन मक्तेदार, शहर सचिव दत्ता पोतदार, शहर उपाध्यक्ष अंबादास पोतदार, रतन पोतदार, सौदागर गोरे, किशोर महामुनी, बापू पोतदार, योगेश दीक्षीत, दीपक वेदपाठक, शंकर जाधव, आकांक्षा शर्मा, कमलेश साळुंके, ज्ञानेश्वर काडगावे, सूरज पोतदार, बंडू पोतदार, शुभम पोतदार, ओंकार वेदपाठक, नंदू वेदपाठक, मुकुंद पोतदार, गणेश बंगाली, कदम आटणीकर, शहाजी जाधव यांच्यासह तालुक्यातील सराफ दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बंडू पोतदार यांनी केले. तालुकाध्यक्ष संभाजी पोतदार यांनी आभार मानले.





