भूकंपात मरण पावलेल्यांना सास्तूर ग्रामस्थांकडून सामूहिक श्रध्दांजली; अन्नदान, महिलांना साडी-चोळीचे वाटप

लोहारा (जि. धाराशिव): १९९३ साली झालेल्या प्रलयंकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना सास्तूर ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी (ता. ३०) आमदार ज्ञानराज चौगुले, कळंबचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी निराधार, परितक्त्या महिलांना साडी, चोळीचे वाटप करून अन्नदान करण्यात आले. लोहारा तालुक्यातील सास्तर येथे भूकंपात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या सन्मार्थात उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभास ग्रामस्थांच्या वतीने दर वर्षी सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात येते. यंदा भूकंपाला तीस वर्ष होतअसल्याने सामूहिक श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी इंगलंड येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस. कृष्णदा, आमदार ज्ञानराज चौगुले, कळंबचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, उपाध्यक्ष राहूल पाटील, सरपंच शीतल पाटील, स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, महम्मद बागवान, रवीकिरण बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या उपस्थितीत स्मृती स्तंभाला पुष्पार्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर सास्तूर चौरस्त्यावर विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भूकंपग्रस्त भागातील निराधार, परितक्त्या, गरीब कुटुंबातील महिलांना साडी, चोळीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी अल्ताफ बागवान, शरण दलाल, शहबाज मुल्ला, शांतेश्वर दलाल, दिलीप बेंडगे, बाबू वल्याळ, जीवन वल्याळ, लियाकतसाब कादरी, फजल कादरी, रहेमान शेख, संतोष यादव यांनी पुढाकार घेतला





