ईतर

होम मिनीस्टर पैठणीच्या मानकरी ठरल्या ज्योती भोसले

  1. मुरुम (जि. धाराशिव): येथील यशवंत नवरात्र महोत्सव मंडळ व रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने रविवारी (ता.१३) आयोजित होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) “सन्मान महिलांचा” या कार्यक्रमात मानाच्या पैठणीच्या मानकरी ज्योती भोसले ठरल्या आहेत. सेमी पैठणी श्रावणी भंडे, आर्ट पैठणी द्वितीय तर सुनिता धुमूरे या तृत्तीय विजेत्या ठरल्या. दुर्गाप्रसाद मोटे संकल्पीत मनोरंजनात्मक पैठणीचा खेळ महाराष्ट्रात सुपरिचित आहे. रविवारी या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होती. या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे शंभराहून अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदविला. पहिल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ज्योती भोसले ठरल्या, सेमी पैठणी द्वितीय श्रावणी भंडे, आर्ट पैठणी तृत्तीय सुनिता धुमूरे यांना रोटरी क्लब मुरुम सिटीकडून पैठणी बक्षीस तर उत्तेजनार्थ माऊली मोबाईल शाॅपी विनोद गायकवाड यांच्याकडून स्नेहल कुलकर्णी (कंटेकूर), संगिता तांदळे, सुमित्रा वाघमारे यांना हेड फोन बक्षीस देवून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध भारतीय मनोरंजनात्मक खेळातून ६ महिलांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली. मंडळाकडून नवरात्रात शालेय विद्यार्थी, महिला व वृध्दांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनील राठोड, रोटेरीयन शिवशरण वरनाळे, प्रा. डाॅ. महेश मोटे, प्रकाश रोडगे, डाॅ. नितीन डागा, मल्लिनाथ बदोले, प्रा. राजाराम वाकडे, प्रा. भुषण पाताळे, उपप्राचार्य कलय्या स्वामी, पंडीत मोहिते, डॉ. सुधीर पंचगल्ले, विजयकुमार देशमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. रोटरीयन डाॅ. सुवर्णा पाटील, बबिता महानुर, निर्मला कोरे, महानंदा चिलगर, मीरा मोटे, प्रा. विजया बेलकेरी, अलका गायकवाड आदींची विशेष उपस्थिती होती. यावेळी होम मिस्टर सादरकर्ते दुर्गाप्रसाद मोटे यांचा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रारंभी धर्मवीर चौक या फलकाचे फीत कापून उद्घाटन रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे यांनी केले. यावेळी सचिव सुनिल राठोड, डॉ. महेश मोटे, राजकुमार वाकडे, गौरीशंकर बोंगरगे, बलराम वासुदेव, श्रीधर निलवाडे, अमोल पालापूरे, संजय सुरवसे आदींची उपस्थिती होती. डॉ. सुवर्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष गौरीशंकर बोंगरगे, उपाध्यक्ष बलराम वासुदेव, सचिव श्रीधर निलवाडे, अमोल पालापूरे, संजय सुरवसे, सतिश कुंभार, सुधीर चव्हाण, धनपाल चौहान, तेजस निलवाडे, आकाश घोडके, धानप्पा ढंगे, शुभम पुराणे, आदित्य इक्कलगी, निशांत पडलवार, श्रेयस चव्हाण, अनिकेत पाटील, रितेश राठोड, मानव चव्हाण, ओंकार सुरवसे, पवन शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डाॅ. शिला स्वामी व संगिता देशमाने तर आभार विजयकुमार देशमाने यांनी मानले. पावसात देखील होम मिनिस्टर खेळात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close