ईतर
प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपप्रमुखपदी दयानंद राठोड यांची नियुक्ती

- लोहारा (जि. धाराशिव): शहरातील दयानंद राठोड यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख वर्षद शिंदे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. दयानंद राठोड प्रहार जनशक्तीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. लोहारा तालुक्यात पक्ष वाढीसाठी भरीव प्रयत्न केले आहेत. शिवाय पक्षाच्यामाध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हाप्रमुख वर्षद शिंदे यांनी दयानंद राठोड यांच्यावर प्रहार जनशक्तीच्या जिल्हा उपप्रमुखपदाची जबाबदारी सपवली आहे. धाराशिव येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख श्री. केदार, दिनेश गुडे, परंडा तालुकाप्रमुख आप्पासाहेब तरटे, धाराशिव तालुकाप्रमुख प्रजय पवार, तुळजापूर तालुकाप्रमुख शशिकांत मुळे, तय्यब शेख, परंडा महिला आघाडी प्रमुख लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह जिल्हाभरातील प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.





