संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

लोहारा: शहरातील नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील पाटोदा रोडवर असलेल्या भारत माता मंदिरामध्ये संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजयकुमार ढगे, भाजप ओबीसी सेलचे लोहारा तालुका उपाध्यक्ष संतोष फरिदाबादकर, सुरेश गायकवाड, अमोल फरिदाबादकर, बालाजी माने, राजु ढगे, कल्याण ढगे, जितेश फुलकुते, दीपक फरिदाबादकर, महेश फरिदाबादकर, अरुण लोखंडे, महादेव लोखंडे, राहुल बेळकुणीकर, विशाल फरिदाबादकर, अमोल जगदाळे, जनकल्याण समिती चे शंकर जाधव, मनोज तिगाडे, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव उपस्थित होते.





