राजमाता प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील नागूर येथील राजमाता प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. बाल चिमुकल्यांनी विविध गितावर नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. राजमाता प्रायमरी शाळेत गुरूवारी (ता. ७) सायंकाळी आयोजित स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील होते. यावेळी सरपंच अर्चना कांबळे, उपसरपंच दिनकर जावळे-पाटील, लोहारा नगरपंचायतचे नगरसेवक अमीन सुंबेकर, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, अभिमान खराडे, दीपक रोडगे, मुख्याध्यापक तानाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, गोंधळी, आराधी, रिमिक्स गितांवर बहरदार नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, राम, कृष्ण, विठ्ठल रूक्माई यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषेन सर्वांचे लक्षवेधून घेतले. कार्यक्रमासाठी तानाजी पाटील, अमोल पाटील, स्वाती निकम, वर्षा चंदनशिवे, सुवर्णा साबळे, पप्पू सोणवणे यांनी पुढाकार घेतला.




