शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराचे वितरण
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झाला गौरव

लोहारा (जि. धाराशिव): शहरातील तालुका शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या वतीने सहा जणांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
नव्याने बांधण्यात आलेल्या तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात अॅड. दीपक जवळगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, पतसंस्थेचे चेअरमन राम मुसांडे, मनोहर वाघमोडे, विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, नगरसेवक अमीन सुंबेकर, आरती कोरे, जालिंदर कोकणे, गौस मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. विकास घोडके यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा मांडून सभासदांना लाभांश ९.७५ टक्के दराने देण्यात येणार असल्याचे प्रास्ताविक भाषणात सांगितले. संस्थेकडून देण्यात येणाऱ्या ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गुरुनाथ पांचाळ (लोहारा), श्रीशैल्य जट्टे (कानेगाव), राहूल भेडे (माळेगाव), सुभाष नागणे (आष्टाकासार), शीतल जाधव (हराळी), राजपुत्र पाटील (सास्तूर) यांना सन्मानित करण्यात आले. मंदोदरी कोळी यांना आदर्श कर्मचारी तर भोसगा शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल आदर्श कुमार, आदित्य नन्नवरे, भक्ती पांढरे, रितेश बनकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल मनोहर वाघमोडे, दीपक पोतदार, मदन कुलकर्णी, माधवराव गवळी, पांडुरंग समदळे, हणमंत सगर, अशोक जाधव, शांतवीरप्पा जट्टे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ठेवीदार सभासद मोहन शेवाळे, पंडित राठोड, विजयकुमार बुकन यांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवत ठेवी ठेवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक संघटना अध्यक्ष सुदर्शन जावळे, दत्तात्रय फावडे, सुरेश साळुंके, विकास घोडके, शफीक गवंडी,नारायण घोडके, श्री. डावरे, दत्तात्रय दंडगुले, मच्छिंद्र बोकडे, महिला तालुकाध्यक्ष वर्षा चौधरी, संतोष भोजने, सचिन भोसले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सूर्यकांत पांढरे यांनी केले. विश्वजीत चंदनशिवे यांनी आभार मानले. जीवन गायकवाड, दत्तात्रय पांचाळ, एस. के. जगताप, मधुकर चंदनशिवे, चंद्रकांत कदम, गीतांजली मोटे, दत्तात्रय फावडे, गजानन मक्तेदार, नितीन वाघमारे, रफिक शेख, माया शिंदे, मुक्ता माळी, अर्चना साखरे, उलन कांबळे, सी. जी. माळी, मेघराज कदम, एस. एम शेख, कोंडीबा कारभारी, बाळासाहेब कदम, सतीश माळी, गोविंद जाधव, राहुल ओवांडकर, मनोरथ भोजने, महादेव कुंभार, शंकर काळे, प्रवीण शिंदे, सचिन भोसले, गजानन सुतार, गणेश काळे, गणेश वाघमारे, परमेश्वर सूर्यवंशी, बलभीम क्षीरसागर, यांच्यासह सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र कोकणे, किरण दाशीमे यांनी परीश्रम घेतले.




