साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याची होळीत सांगता; “सावित्रीच्या लेकी” पुरस्काराने ३५ महिला सन्मानित

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील होळी येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जंयतीचा सांगता समारोप सोहळा शनिवारी (ता. नऊ) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५ महिलांना “सावित्रीच्या लेकी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उमरगा-लोहारा तालुक्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीच्या सांगता समारोपाचे आयोजन होळी येथे करण्यात आले होते. सरपंच सरोजा बिराजदार अध्यक्षस्थीनी होत्या. आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, दिलीप गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड, जयंती सांगता समारोपाचे आयोजक अॅड. सुखदेव होळीकर, बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, संजय सरवदे, संजय कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे सुधाकर बनसोडे, नितीन शिंदे, दलित महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, युवा सेनेचे अध्यक्ष शरद पवार, शिवाजी दुनगे, सिताराम कांबळे, निलंग्याच्या माजी सभापती गंगाताई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५ महिलांना “सावित्रीच्या लेकी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान देऊन जातीय सलोखा कायम ठेऊन उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल युवराज कोकाटे, अजित जाधव, प्रदीप मोरे, महादेव बिराजदार, गोविंद जाधव, करण बाबुळसुरे, संजय बिराजदार, धनराज जाधव, राजाभाऊ जाधव, व्यंकट माळी, मारूती जाधव यांचा आमदार चौगुले यांच्या हस्ते “दलित मित्र” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक अॅड. सुखदेव होळीकर यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामपंचात सदस्य केशव सरवदे यांनी केले. संजय मनाळे, शंकर मोरे, मुरली पवार, बालेपीर शेख, गणेश पाटील, दत्ता गायकवाड, पवन मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जालिंदर पाटोळे, कृष्णा सरवदे, मारुती शिंदे, बालाजी शिंदे, संदीप पाटोळे, ईदुकर शिंदे यांनी पुढाकार घेतला.

