राजकिय

युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव यांचा लोहाऱ्यात सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन दिलीप जाधव यांची युवा सेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरातील ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी (दि. १ मार्च) सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष शरद पवार, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख परमेश्वर साळुंके, प्रताप लोभे, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोरे, शहरप्रमुख श्रीकांत भरारे, उमरगा शिवसेना शहरप्रमुख योगेश तपासाळे, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक गौस मोमीन, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, पचायत समितीचे माजी सदस्य दीपक रोडगे, रमेश जाधव, मनोहर कदम, संदीपान बनकर, सुरेश दंडगुले, धर्मवीर जाधव, शेखर पाटील, कुलदीप गोरे, जितू कदम, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close