जिल्हा कृषी अधीक्षकांची हराळी गावाला भेट, पीक-पाण्याची केली पहाणी

लोहारा (जि. धाराशिव): जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने गुरूवारी लोहाराता लुक्याच्या दौऱ्यावर होते. सद्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे त्यांचा तालुका दौर महत्वपूर्णहोता. जिल्हा कृषी अधीक्षक तालुक्यातील हराळी गावास भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. भेटीदरम्यान त्यांनी येथील सुभाष माधव बिराजदार यांच्या शेतात सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने तूर+ सोयाबीन व सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने सलग सोयाबीन लागवड केलेल्या दोन्ही प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन पहाणी केली. दुष्काळी परिस्थितीतसुध्दा कृषी विभागाच्या सहकार्याने व योग्य नियोजनामुळे अतिशय उत्कृष्ट प्लॉट आणल्याबद्दल शेतकरी सुभाष बिराजदार यांचे कौतुक केले. शेतकरी बिराजदार यांना सतत मार्गदर्शन करणारे कृषी सहायक आय. डी. पाटील, कृषी पर्यवेक्षक एम. एम. माळकुंजे, तालुका कृषी अधिकारी एस. ए. ताराळकर यांच्यासह तालुका कृषी विभागाचे प्रात्यक्षिक उत्तम प्रकारे राबवल्याबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान हराळी येथील त्यांनी ज्ञान प्रबोधनी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या रेशीम उद्योग प्रकल्प व सेंद्रिय शेतीची पाहणी केली. यावेळी कृषी साहयक शैलेश जट्टे, दीपक जाधव, नागेश जट्टे, वैजनाथ पंढरपुरे आदी उपस्थित होते.


🙏🙏👍👍