पदोन्नती मिळाल्याबद्दल योगेश कदम यांचा कास्ती ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा (धाराशिव): तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) येथील मूळ हिवासी असलेले व सध्या कसबा संगमेश्वर येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले योगेश कदम यांची रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ याठिकाणी मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. त्याल्याबद्दर ग्रामस्थांच्या वतीने योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.
कास्ती बुद्रुक येथील सभागृहातील आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बडेसाहेब तांबोळी होते. सामाजिक कार्यकर्ती कस्तुरबाई चव्हाण, सोसयटी चेअरमन मनोहर परसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी योगेश कदमयांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी योगेश कदम यांनी मनोगत व्यक्त करून ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी परवेज तांबोळी, भागवत चव्हाण, विशाल रवळे, नागेश चव्हाण, बिभीषण साबळे, अनिल साबळे, बळीराम साबळे, हरिदास चव्हाण, अनंत पाटील, रामेश्वर जगदाळे, महेश कदम, दाजीबा करडे, सुधीर पाटील, पप्पू खराडे, बालाजी काळे, महादेव भरंगडे, शंकर जाधव, व्यंकट शिंदे, बालाजी परसे, प्रवीण अंबेकर, खंडू करडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल साबळे यांनी केले. विभीषण साबळे यांनी आभार मानले.





