राजकिय

“गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” अभियानास मिळतोय प्रतिसाद

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अभियान

लोहारा (जि. धाराशिव): उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने लोहारा तालुक्यात “गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त प्रत्येक गावपातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकीला स्थानिक शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेत मोठी फुट पडल्याने पक्ष दुभंगला गेला आहे. खासदार, आमदारासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने एक हाती उभी केलेली शिवसेना एक झटक्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळी. अनेकांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडली असले तरी कडवा शिवसैनिक मात्र आजही उध्दव ठाकरे यांच्याशी तन-मन-धनाने जोडला गेला आहे. विपरीत परिस्थितीमध्ये विचलीत आणि हतबल न होता एकनिष्ठ शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा नव्याने शिवसेनेची बांधणी उध्दव ठाकरे यांच्याकडून केली जात आहे. पक्ष बांधणीसाठी एकनिष्ठ शिवसैनिक पुढे सरसावले आहेत.

लोहारा शहरासह तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात दाखल झाले. ही उणीव भरून काढण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी एकनिष्ठ, कडवा शिवसैनिक असलेले अमोल बिराजदार यांच्यावर लोहारा तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपवली आहे. तर सलीम शेख यांना शहरप्रमुख पदावर कायम ठेवण्यात आले आहे. उध्दव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी अमोल बिराजदार, सलीम शेख, शिवदूत महेबूब गवंडी, शेखर पाटील, सक्रिय झाले आहेत. पक्ष बांधणीच्या अनुषंगाने तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या संकल्पनेतून लोहारा तालुक्यात “गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” अभियान राबविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या मार्ददर्शनानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेऊन जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जनतेची काळजी घेत केलेले प्रतिबंधात्म लसीकरण, उभारलेली अत्याधुनिक आयसोलेशन सेंटर व घेतलेले धोरणात्मक निर्णयांचा लेखाजोखा व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी केलेली विकास कामे बैठकीत मांडले जात आहे. आतापर्यंत मोघा, नागूर, सालेगाव, भातागळी, हिप्परगा (रवा), सय्यद हिप्परगा आदी गावांमध्ये बैठक घेण्यात आल्या आहेत. हिप्परगा (रवा) शाखाप्रमुख योगेश जाधव, आनिल मोरे, संभाजी मुळे, मोघा शाखाप्रमुख बालाजी जाधव, नितीन जाधव, नागूर शाखाप्रमुख दत्ता पाटील, पप्पू जाधव, आकाश चंदनशिवे, सय्यद हिप्परगा शाखाप्रमुख आदिनाथ भोजराव, गुरूनाथ यादव, शेरखां कारभारी, सालेगाव शाखाप्रमुख विशाल बडुरे, कुलदीप बडुरे, भातागळी शाखाप्रमुख महादेव आनंदगावकर, गणेश फत्तापुरे, दत्त्ता अण्णा, वडगाव येथील अहेमद शेख, रेबेचिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे, शहरातील माजी नगरसेवक श्याम नारायणकर, सोशल मीडियाचे प्रमुख प्रेम लांडगे, रघवीर घोडके, दिनेश गरड आदी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close