ईतर
अन्नपूर्णा तडकले यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन

- लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील आष्टाकासार येथील सर्वात ज्येष्ठ महिला अन्नपूर्णा करबसप्पा तडकले (१०० वर्षे) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर शनिवार (ता. ३०) शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव सिद्रामप्पा करबसप्पा तडकले यांच्या त्या आई होत.





